फैजपूर : प्रतिनिधी
बामणोद येथील सराईत गुन्हेगार रोहित ऊर्फ सोनट्या नितीन केदारे (वय २३) याला फैजपूर उपविभागीय अधिकारी यांनी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
त्याच्या विरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात बरेच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, हवालदार मोती पवार, पोलिस नाईक समाधान पाटील, पोलिस कॉन्स्टेबल मुकद्दर तडवी यांनी केली.