पोकरा योजनेच्या संबंधित अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी
गौरव पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुक्यातील सोनवद परिसरातील गावांना असलेल्या पोकरा योजनेअंतर्गत असलेल्या अधिकारी नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे तातडीने अधिकार्याची नेमणूक करून प्रस्तावित असलेल्या प्रकरणे मंजूर करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पष्टाणे, अनोरा, धानोरा, गारखेडा, बाभळे, उखळवाडी, भामर्डी या ठिकाणी शासनाच्या पोकरा योजनेअंतर्गत कंपनीच्या उमेदवारांचे नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे हवे त्या साहित्याची ऑनलाइन पद्धतीने मागणी करावी लागतात, त्यानंतर कंपनीचे अधिकारी शेतात येऊन त्या ठिकाणी शेतातील फोटो काढून पूर्वसंमती देतात. त्यानंतर शेतातील लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्याची पूर्वसंमती दिली जाते परंतु गेल्या दोन महिन्यापासून परिसरातील शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केलेली नाही.
धरणगाव तालुक्यातील पष्टाणे, अनोरा, धानोरा, गारखेडा, बाभळे, उखळवाडी, भामर्डी या परिसरात असलेल्या पोकरा योजना अंतर्गत असलेल्या प्रतिनिधी गेल्या दोन महिन्यापासून नसल्यामुळे प्रस्तावित प्रकल्प प्रलंबित आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहे. त्यामुळे तातडीने येथील परिसरात पोखरा अंतर्गत असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.