नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील नाशिक जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दिंडोरी कळवण रस्त्यावरील संस्कृती लॉनच्या समोर झालेल्या अपघातात सात जण ठार झाले आहे. अपघातामधील मृतांमध्ये तीन महिला, तीन पुरुष तसेच लहान बालकांचा देखील समावेश आहे. मोटरसायकल आणि अल्टो कार यांच्यात हा अपघात झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्री 11 :30 च्या सुमारास मोटरसायकल आणि अल्टो कार क्रमांक एम एच ०४ डी वाय ६६४२ यांचा अपघात झाला असून अल्टो कार मधील सात प्रवासी ठार झाले आहेत. तर मोटरसायकल चालवणारे मंगेश यशवंत कुरघडे वय-२५, अजय जगन्नाथ गोंद वय -१८, राहणार नडगे गोट, तालुका जव्हार जिल्हा पालघर सध्या राहणार सातपूर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मृतांचे शवविच्छेदन दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. मृत हे कोशिंबे देवठाण व सारसाळे येथील रहिवासी आहेत. दिंडोरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शना खाली सुरु असून दिंडोरी पोलिस ठाण्यात अपघाताची माहितीची नोंद करण्यात आली आहे .
अपघातात मृत व्यक्ती
- देविदास पंडित गांगुर्डे, वय -28 – रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा -नाशिक
- मनीषा देविदास गांगुर्डे, वय -23 वर्षे – रा. सारसाळे ता. दिंडोरी, जिल्हा. नाशिक
- उत्तम एकनाथ जाधव, वय – 42 वर्षे – रा- कोशिंबे, ता दिंडोरी, जिल्हा – नाशिक
- अल्का उत्तम जाधव, वय – 38 वर्षे – रा. कोशिंबे ता. दिंडोरी जिल्हा. नाशिक
- दत्तात्रेय नामदेव वाघमारे, वय – 45 वर्षे – रा. देवपूर, देवठाण ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक
- अनुसया दत्तात्रय वाघमारे, वय – 40 वर्षे – रा देवपूर, देवठाण ता – दिंडोरी, जिल्हा – नाशिक
- भावेश देविदास गांगुर्डे, वय – 02 – रा. सारसाळे, ता दिंडोरी, जिल्हा- नाशिक