छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील काबाडकष्ट करून चार एकर शेतामध्ये कोथिंबिरीचे पीक घेतले. चार पैसे हाताशी येतील या आशेने जीवापाड जपलेल्या कोथिंबिरीला बाजारात योग्य भाव न मिळाल्याने एका शेतकऱ्याने निराश होऊन चक्क ४ एकर कोथिंबिरीवर रोटर फिरवल्याची दुर्दैवी घटना चाकूर येथे घडली आहे. दयानंद धोंडगे हे चाकुरातील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते दिवसरात्र शेतीत राबतात, त्या पिकास विविध खते, अत्याधुनिक औषधी आणि फवारणीचा वापर करून चाळीस दिवस त्याची निगा राखली. बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी बाजारात कोथिंबीरच्या भावाची विचारपूस केली.
कोथिंबीरचे भाव पडल्याचे लक्षात येताच शेतात केलेली मेहनत आणि त्यासाठी केलेला ४० हजार खर्च निघणार नाही, मजुरीचे पैसेही निघेनात, शेवटी नाईलाज म्हणून शेतकरी दयानंद धोंडगे यांनी आपल्या कोथिंबीरच्या उभ्या पिकावरच थेट रोटर फिरवला आहे. दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत चालले असून महागाईचा बडगामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, बाजारभाव नाही. नुकसान भरपाई वेळेत व विमा संरक्षण नाही त्यामुळे शेतकऱ्याला वालीच उरला नाही.
ऐन भरात कोथिंबीरचे भाव गडगडल्याने खर्च तर दूरच, काढणीची मजुरीदेखील निघत नसल्याने चक्क ट्रॅक्टरचा रोटर फिरवण्याची वेळ दयानंद धोंडगे या शेतकऱ्यावर आली आहे. शेतकऱ्याने जगायचं तरी कसं? असा प्रश्न सतावत आहे. तर कोथिंबीरला भाव नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.
काबाडकष्ट करून चार एकर शेतामध्ये कोथिंबिरीचे पीक घेतले. चार पैसे हाताशी येतील या आशेने जीवापाड जपलेल्या कोथिंबिरीला बाजारात योग्य भाव न मिळाल्याने एका शेतकऱ्याने निराश होऊन चक्क ४ एकर कोथिंबिरीवर रोटर फिरवल्याची दुर्दैवी घटना चाकूर येथे घडली आहे.
दयानंद धोंडगे हे चाकुरातील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते दिवसरात्र शेतीत राबतात, त्या पिकास विविध खते, अत्याधुनिक औषधी आणि फवारणीचा वापर करून चाळीस दिवस त्याची निगा राखली. बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी बाजारात कोथिंबीरच्या भावाची विचारपूस केली. कोथिंबीरचे भाव पडल्याचे लक्षात येताच शेतात केलेली मेहनत आणि त्यासाठी केलेला ४० हजार खर्च निघणार नाही, मजुरीचे पैसेही निघेनात, शेवटी नाईलाज म्हणून शेतकरी दयानंद धोंडगे यांनी आपल्या कोथिंबीरच्या उभ्या पिकावरच थेट रोटर फिरवला आहे. दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत चालले असून महागाईचा बडगामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, बाजारभाव नाही. नुकसान भरपाई वेळेत व विमा संरक्षण नाही त्यामुळे शेतकऱ्याला वालीच उरला नाही.
ऐन भरात कोथिंबीरचे भाव गडगडल्याने खर्च तर दूरच, काढणीची मजुरीदेखील निघत नसल्याने चक्क ट्रॅक्टरचा रोटर फिरवण्याची वेळ दयानंद धोंडगे या शेतकऱ्यावर आली आहे. शेतकऱ्याने जगायचं तरी कसं? असा प्रश्न सतावत आहे. तर कोथिंबीरला भाव नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.