मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्यावरून एकत्र आल्यानंत शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीच्या जोरदार चर्चा होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना ठाकरे बंधूंचे एकत्र येणे याला राजकीय लेअर असल्याचे बोलले जात आहे.
मात्र, अद्यापर्यंत उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यावर सकारत्मकता दाखवली असली तरी राज ठाकरे आपली सावध भूमिका घेत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर समोर आला आहे. या टीझरमध्ये राऊत विविध मुद्यांवर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरी वारे काही हटत नाही थंड पडत नाही, असं विचारतात. “सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आहे आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यासाठी नाही, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज आपल्या सोबत असल्याचे म्हटले आहे, यामुळे त्यांच्या या विधानामुळे ठाकरे बंधू येणार का या चर्चांना उधाण आले आहे.
समाजाच्या हितासाठी आम्ही करत आहोत. आमच्या आजोबांपासून नंतर शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे, असे विधान करून उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उभारी दिली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर राज ठाकरे काय प्रतक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
दरम्यान, इगतपुरी येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे शिबिर पार पडले. या शिबिरात राज ठाकरे यांच्या पत्रकारांच्या अनौपचारिका गप्पांमध्ये शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या बाबात नोव्हेंबरमध्ये निर्णय घेऊ असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, मी असे काही विधानच केले नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी एक्सवरून एक पोस्ट शेअर करत याविषय़ी सविस्तर लिहित ज्यांनी या बाबम्या समोर आणल्या त्यांना खडेबोल सुनावले आहेत.