जळगाव : प्रतिनिधी
शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन रविंद्र रामचंद्र धनगर (वय ३५, रा. त्रिभूवन कॉलनी, कानळदा रोड) यांच्यासह त्यांच्या भावाला तिघांनी बेदम मारहाण केली. तसेच रविंद्र धनगर यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारुन जखमी केले. ही घटना दि. १५ रोजी सकाळच्या सुमारास त्रिभूवन कॉलनीत घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कानळदा रोडवरील त्रिभूवन कॉलनीत रविंद्र धनगर हे वास्तव्यास असून महावितरण येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नोकरीस आहे. दि. १४ रोजी त्यांचा लहान भाऊ सुनिल धनगर हा रात्री ११ वाजता कामावरुन घरी येत असतांना, योगेश परदेशी याने काहीही कारण नसतांना त्याला शिवीगाळ केली. हा प्रकार सुनिल याने रविंद्र धनगर यांना सांगितला होता. दरम्यान, मंगळवार दि. १५ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्या परिसरातील दूध केंद्राजवळ रविंद्र धनगर हे भाऊ सुनिल व चुलत भाऊ कपील बाविस्कर, सागर सोनवणे यांच्योबत उभे होते.
यावेळी तीथे आलेल्या सुरज गणेश परदेशी, योगेश परदेशी, भाग्यदीप उर्फ बब्बू परदेशी हे तेथे आले. त्यावेळी रविंद्र धनगर यांनी त्यांना मला व माझ्या भावाला शिवीगाळ का केली असे विचारले असता, त्यांनी पुन्हा शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत सुरज परदेशी याने त्याच्या हातातील लोखंडी पाईप रविंद्र धनगर यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. त्यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित सुरज गणेश परदेशी, योगेश सिताराम परदेशी, भाग्यदीप उर्फ बब्बू गणेश परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.