भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील एका भागात भांडणात तिघांविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अश्लील शिवीगाळ, विनयभंग, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला व तिचा मोठा भाऊ तसेच लहान बहीण यांना किरकोळ कारणावरून भास्कर चावदस चिनावले, विनोद बढे, अतुल बढे व राहुल बढे या चौघांनी दमबाजी केली. महिलांवर अश्लील टिप्पणी केली. फिर्यादी महिलेच्या भावासही मारहाण केली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात भास्कर चावदस चिनावले (रा. गडकरी नगर), विनोद, अतुल व राहुल बढे (सर्व रा. गांधी नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.