चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील घाट रोडवरील साबीर स्क्रब या भंगार दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ४० हजार रुपये रोख रकमेसह ३० हजार रुपये किमतीचे ३० किलो केस लांबविले. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर अन्य तीन फरार आहेत. संशयितांकडून मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चोरीची ही घटना दि. ९ जुलै रोजी सायंकाळी ७:३० ते दि. १० रोजी घडली होती. पोलिसांनी आलमगीर शेख रफिक (३८, रा. मदनीनगर, जामनेर) व हकीम खान रफिक खान (२९, रा. पहूर पेठ, पहूर, . जामनेर) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजय मालचे, हवालदार प्रशांत पाटील, पोकों नितीन आगोणे, रवींद्र बच्छे, आशुतोष सोनवणे व जामनेर पोलिस ठाण्याचे पोकों अमोल पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या चोरी प्रकरणात आणखी तीन आरोपी फरार असून, गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि आरोपींचा शोध घेत आहेत


