जळगाव : प्रतिनिधी
शनिपेठ व शहर पोलिस ठाण्यामध्ये वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन जणांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी काढले.
सविस्तर वृत्त असे कि, शनिपेठ परिसरातील गुरुनानक नगरातील रहिवासी नीलेश नरेश हंसकर याच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल असण्यासह दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या शिवाय इंद्रप्रस्थनगरातील दीपक दगडू भोई याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात सहा वेगवेगळे गुन्हे दाखल असण्यासह दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या दोघांकडून आणखी काही गंभीर गुन्हा घडू शकतो, त्यामुळे दोघांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव अनुक्रमे शनिपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या वतीने पाठविण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल पाठविला होता. हद्दपारीचे एकूण ३२ प्रकरणे प्रस्तावित असून, त्यातील दोन प्रकरणांना मंजुरी मिळाली. २२ प्रकरणे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी प्रलंबित असून, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे आठ प्रकरणे आहेत.