Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना कार्यकर्त्यांनी फासलं काळं
    क्राईम

    संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना कार्यकर्त्यांनी फासलं काळं

    editor deskBy editor deskJuly 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोलापूर : वृत्तसंस्था

    जिल्ह्यातील अक्कलकोटमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना लोकांकडून तोंडाला काळं फासण्यात आले आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना हि घटना घडली आहे. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना काळं फासण्यात आले.

    हाती आलेल्या माहितीनुसार प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते. यावेळी ते फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी आले होते. तिथे येताच काही लोक अचानकपणे त्यांच्याकडे आले आणि जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं. काळं फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असल्याचे समजत आहे.

    प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचादेखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. एवढेच नाहीतर यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते.

    प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आहेत. एकूण दोन संभाजी ब्रिगेड आहेत. गायकवाड हे दुसऱ्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्रभर दौरे करत असतात. ते आज अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमस्थळी दाखल होत असतानाच शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते तेथे जमा झाले आणि गायकवाड यांना काळे फासले.

    शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्यानंतर प्रवीण गायकवाड हे कारमध्ये जाऊन बसले. मात्र शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते जास्त आक्रमक झाले होते. त्यांनी कारमध्ये घुसून गायकवाड यांना मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावर देखील मारहाण करण्यात आली. यामुळे अक्कलकोटमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.