Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !
    क्राईम

    अमळगावनजीक शेतमजुरांच्या वाहनाला अपघात : २२ जण जखमी !

    editor deskBy editor deskJuly 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    शेतमजुरांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जीपने धडक दिल्याने २२ जण जखमी झाले. यापैकी २ जण गंभीर आहेत. हा अपघात १२ रोजी सकाळी अमळगाव-जळोद रस्त्यावर घडला.

    सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील बुधगाव येथून एकाच रिक्षामध्ये (एमएच १९ बीजे ४३६५) सुमारे १६ शेतमजूर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अमळगावकडे आणले जात होते. त्यावेळी अमळगावकडून जळोदकडे जाणाऱ्या जीपवरील (एमएच १९ सीझेड २५२२) चालक पवन तुकाराम बाविस्कर याने जोरात धडक दिल्याने रिक्षातील काही प्रवासी रस्त्यावर फेकले गेले व काही रिक्षात अडकले.

    या अपघातात रिक्षात बसलेले विकास भिला कोळी (वय ३५), सचिन कैलास शिरसाठ (वय २२), उमेश कैलास शिरसाठ (वय १९), रघुनाथ साहेबराव शिरसाठ (वय ५५), वैशाली रवींद्र कोळी (वय २७), नंदा विकास कोळी (वय २८), मुक्ताई लीलाधर भोई (वय १७), संगीता बळीराम कोळी (वय ३५), कल्पना  रघुनाथ कोळी (वय ४७), रिक्षाचालक योगेश भिका कोळी (वय ३१, सर्व रा. बुधगाव) यांना अमळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी प्रतिभा कैलास कोळी व कैलास नवल कोळी यांना धुळे येथे रवाना करण्यात आले. सुवर्णा विलास कोळी (वय ३५) व प्रांजल विलास कोळी (वय १६) यांना अमळनेर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीपचा चालक पवन तुकाराम बाविस्कर, शीतल पवन बाविस्कर, मीराबाई बाविस्कर तसेच अशोका व प्रांतल कोळी या बालकांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. रेखाबाई भरत शिरसाठ (वय ४५), सुंदरबाई उत्तम कोळी (वय ५३), जनाबाई निंबा साळुंखे (वय ७५) यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

    घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हे.कॉ. संदेश पाटील, राहुल पाटील, योगेश बागुल घटनास्थळी पोहचले होते. पथकाकडून प्राथमिक पंचनामा झाल्यानंतर इतर जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.