जळगाव : प्रतिनिधी
घरमालक बाहेरगावी गेलेले असताना बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख ६० हजार रुपयांसह चांदीच्या देवीदेवतांच्या मूर्ती असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना दि. २७ जून ते ९ जुलैदरम्यान वाघनगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. या प्रकरणी १० जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वाघ नगर परिसरातील रहिवासी अनिल नामदेव विश्वे (६५) हे २७ जून रोजी बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातून रोख ६० हजार रुपये तसेच पाच हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या देवीदेवतांच्या मूर्ती असा एकूण ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घरमालक ९ जुलै रोजी रात्री घरी आले, त्यावेळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी विश्वे यांनी तालुका पोलित ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.