Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘हॉटेल रॉयल पॅलेस’मधील जुगार अड्डा उद्ध्वस्त : मध्यरात्री ८ जण अटकेत !
    क्राईम

    ‘हॉटेल रॉयल पॅलेस’मधील जुगार अड्डा उद्ध्वस्त : मध्यरात्री ८ जण अटकेत !

    editor deskBy editor deskJuly 11, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जुगार मोठ्या प्रमाणात सुरु असतांना आता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या लेखी आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने ‘हॉटेल रॉयल पॅलेस’ येथे छापा टाकून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत १९ लाख ९७ हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि १३ मोबाईल हँडसेटसह ८ जुगारींना अटक करण्यात आली आहे.

    मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गुरूवारी १० जुलै रोजी मध्यरात्रीनंतर हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदानाजवळील रूम नंबर २०९ मध्ये काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी पोउनि शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अकरम याकुब शेख, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.हे.कॉ. प्रविण भालेराव, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण, पो.ना. किशोर राजाराम पाटील आणि पो.कॉ. रविंद्र श्रावण कापडणे यांचा समावेश असलेले पथक तयार केले.

    ११ जुलै रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास पथकाने हॉटेल रॉयल पॅलेस गाठून खात्री केली. हॉटेलमधील रुम नंबर २०९ ही मदन लुल्ला याच्या नावावर आरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने छापा टाकला असता, तिथे ८ इसम जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून रोख १९ लाख ९७ हजार रुपये आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे १३ मोबाईल हँडसेट असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    यांना घेतले पोलिसांनी ताब्यात

    पप्पु सोहम जैन रा. बळीराम पेठ, रुखील (वय-३२) रा.जळगाव , भावेश पंजोमल मंधान (वय-३७) रा. रामाराम नगर,सिंधी कॉलनी, मदन सुंदरदास लुल्ला (वय ४२) रा. गणपती नगर, सुनील करलाल वालेचा (वय-४०) रा. सिंधी कॉलनी, अमित राजकुमार वालेचा (वय-४५) रा. गणेश नगर, विशाल दयानंद नाथानी (वय ४८ ) रा. गायत्री नगर, आणि कमलेश कैलाशजी सोनी (वय-३६) रा. वाघुळदे नगर, पिंप्राळा रोड जळगाव यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या ८ जणांविरोधात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीनुसार, रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.