जळगाव : प्रतिनिधी
केटरिंगच्या कामाच्या अवघ्या १३०० रुपयांच्या वादातून केसी पार्कजवळ बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रवीण ऊर्फ सोनू देवरे या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात प्रवीण गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या त्याच्या मावशीलाही मारहाण करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, रेखा जगदीश खत्री (वय ४८, रा. जोशी वाडा, मेहरूण) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा संजय खत्री हा केटर्सचा व्यवसाय करतो, त्याच्याकडे यश सपकाळे हा कामाला होता. यश सपकाळे याचे १३०० रुपये संजयकडे घेणे बाकी होते. यावरून बुधवारी दुपारी व रात्री वाद झाला. यातून संजयला मारहाण केली. मध्यस्थी करणारा त्याचा आत्येभाऊ प्रवीण ऊर्फ सोनू देवरे याच्यावर प्राणघातक हल्ला केला. रेखा खत्री यांनाही मारहाण झाली. पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.