फैजपूरः प्रतिनिधी
आमोदा-बामणोद दरम्यान रविवारी रात्री दोन दुचाकींचा अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या जलील खालील तडवी (२४, रा तडती वाडा, फैजपूर) याचा गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे कि, आमोदा मोर नदीपात्रात रविवारी पहाटे लक्झरी बस कोसळली होती. त्यातही एक महिला ठार झाली व त्याच दिवशी रात्री आमोदा गावाजवळील हॉटेल मानसीजवळ दोन दुचाकींची धडक झाली होती. त्यात जलील हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.