मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने आयकरची नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉटेल, प्लॉट खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. दरम्यान, सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनाही अशीच एक नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, आयकर विभाग असेल इतर विभाग असतील हे त्यांचे काम करत आहे. त्यांचे काम करत आहे, त्यात काही गैर नाही. 2019 आणि 2024 मध्ये संपत्तीमध्ये झालेली वाढ यावर स्पष्टीकरण मागितले आहे, ते त्यांचे काम करत आहेत.
संजय शिरसाट म्हणाले की, काही लोकांना वाटते की राजकीय पुढाऱ्यांना काही कारवाई होत नाही, असे काही नाही. आयकर विभागाने त्यांचे काम करत मला नोटीस दिली असून मी त्याला उत्तर देणार आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, काही लोकांनी माझ्याविरोधात आयकर विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल विभागाने घेत मला नोटीस पाठवली.आयोगाने उत्तर देण्यासाठी 9 तारीख दिली होती पण आम्ही वेळ वाढवून मागितला आहे. त्यांत गैर असे काही. त्यांना केवळ स्पष्टीकरण हवे आहे. ह्याचे उत्तर आम्ही देणार आहोत.
संजय शिरसाट म्हणाले की, काही लोकांना पोटदुखी आहे, पण आपण या नोटीसला उत्तर देऊ. यंत्रणा त्यांचे काम करत आहे, मला त्यांच्यार काही आक्षेप नाही. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि कुणी दबाव टाकण्याचा प्रयत्नही करत नाही, त्यांची चिंता करण्याचे काही काम नाही. मला नोटीस आली, खासदार श्रीकांत शिंदेंना नोटीस आली म्हणजे खूप काही वेगळं नाही आयकर विभाग त्यांचे काम करत आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असे मी म्हणणार नाही. शिवसेनेचे नेते रडारवर आहेत असे मी म्हणणार नाही. आयटी विभाग आपले काम करत आहे. आम्ही त्यांना सहकार्य करु. त्यांना हवी असलेली माहिती देऊ. यंत्रणेला सर्व गोष्टी तपासण्याचा अधिकार आहे. 2024 च्या निवडणुकीच्या अर्ज दाखल करताना सर्व माहिती दिली आहे. अतुल सावेंच्या खात्यात काही घोटाळा झाला का नाही याबद्दल मला माहिती नाही. पण त्यावर सावे योग्य निर्णय घेतील.