Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोघांनी केली शालक व मेहुण्याला जबर मारहाण !
    क्राईम

    दोघांनी केली शालक व मेहुण्याला जबर मारहाण !

    editor deskBy editor deskJuly 10, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    अचानक घरामध्ये घुसून उद्देश मंगेश पाटील (२५, रा. हरिविठ्ठलनगर) व त्यांचा शालक राकेश रामदास सूर्यवंशी यांना दोन जणांनी मारहाण केली, तसेच पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना ८ जुलै रोजी, हरिविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम करणारे उद्देश पाटील हे हरिविठ्ठल नगरात परिवारासह राहतात. ८ जुलै रोजी घरामध्ये शालकासह गप्पा करीत असताना अचानक तेथे दोन जण आले व त्यांनी दोघांना शिवीगाळ करीत मारहाण केली. एकाने धारदार शस्त्राने पाटील यांच्या कानावर व पोटावर वार केले. यात त्यांना जबर दुखापत झाली. याप्रकरणी उद्देश पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026

    ३२ वर्षीय तरुणाने घेतली तापी नदी पात्रात उडी !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.