जळगाव : प्रतिनिधी
वर्गामध्ये मुले भांडण करीत असल्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने चापटांनी मारहाण करीत पोटाला चिमटा घेतल्याप्रकरणी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ८ जुलै रोजी अभिनव शाळेत घडला.
सविस्तर वृत्त असे कि, शाहू नगरातील रहिवासी शरिफा सत्तार भिस्ती या महिलेचा मुलगा मोहम्मद अजहर शेख इकबाल हा अभिनव शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ८ जुलै रोजी दुपारी वर्गातील मुलांचे भांडण झाले. यावरून शिक्षिका नीता शैलेश पाटील (४४) यांनी अजहरला चापटांनी मारहाण करीत पोटाला चिमटा घेतला. हा प्रकार त्या मुलाने आईला सांगितल्यानंतर त्याच्या आई शरिफा सत्तार भिस्ती यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिक्षका नीता पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. अलका शिंदे करीत आहेत.