जळगाव : प्रतिनिधी
पैसे व दागिने घेऊन जळगावच्या मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणात मीना प्रकाश बोरसे हिला बुधवारी (९ जुलै) बऱ्हाणपूर येथून अटक करण्यात आली. तिच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या मुलीचे परस्पर कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून देण्यासह लग्नासाठी दिलेले पैसे व दागिने परत मिळण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तसेच कोल्हापूर येथील आशिष गंगाधरे याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असल्याने मुलीनेही दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कार, पोस्को व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. या शिवाय परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील प्रकरणातही गुन्हा दाखल आहे.