पारोळा : प्रतिनिधी
बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत, दोन चोरट्यांनी एका इसमाच्या खिशातून ५० हजार रुपयांची चोरी करून पसार होत असताना, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले, तर एक फरार झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण मानसिंग पवार (जुनोने, ता. रावेर) हे पारोळा येथील त्यांचे चुलत सासरे धनराज चव्हाण यांच्याकडून ऊसतोडचे पैसे घेऊन बस स्थानकावर आले असता, तरुणाने त्यांना धक्का दिला. बसमध्ये चढल्यानंतर त्यांना त्यांच्या खिशातील पैसे गायब असल्याचे दिसून आले. त्याच वेळी इसमाचाही मोबाइल चोरीस गेला. या चोरीतले दोन चोरटे चोरी करून पळत असताना पोलिस आशिष पुरुषोत्तम गायकवाड आणि दीपक हिलाल पाटील यांनी कन्हय्या रमेश चव्हाण (काळेनगर, शिवाजीनगर, जळगाव) यास पकडले. यावेळी सहकारी मात्र फरार झाला