जळगाव : प्रतिनिधी
हतनूर येथील रहिवासी अमोल बाबुराव पाटील हे त्यांचे नातेवाईकांना भेटण्यासाठी पाळधी येथे आले असता ते त्यांना भेटून मुसळी येथे जात असताना त्यांना महामार्गावर कंटेनरने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या वेळी पळून जाणाऱ्या कंटेनरचा पाळधी पोलीसांनी पाठलाग करून त्याला ताब्यांत घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि.६ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास येथील महामार्गावरून हतनूर येथील रहिवासी अमोल बाबुराव पाटील हे पाळधी येथील नातेवाईकांना भेटून मुसळी येथे आपल्या दुचाकी क्र. एम एच १९ ए आर ५८२४ ने जात असताना त्यांना कंटेनर क्र. एम पी ०९ जी एच ५००३ ने धडक दिली.
ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांच्या जागीच मृत्यू झाला. धडक देवुन कंटेनर चालक पसार झाला होता. मात्र पाळधी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला येथील जळगांव कडे जाणाऱ्या महामार्गावरील धाब्या जवळ पकडून त्याला ताब्यात घेतले. पाळधी पोलीसांनी मृतदेह पुढील कारवाई साठी जिल्हा रुग्णालयात पाठविला असून कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेचा पुढील तपास स. पो. नि. प्रशांत कंडारे व त्यांचे सहकारी करीत आहेत.