अमळनेर : प्रतिनिधी
दुचाकीवरून अवैध देशी, विदेशी कंपनीचा दारूसाठा घेऊन जाणाऱ्या तालुक्यातील जानवे येथील एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळील ४३ हजार २५५ रुपये किमतीचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांना एका दुकानातून देशी, विदेशी कंपनीचा दारूसाठा एक जण दुचाकीने घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पो. कॉ. हितेश प्रकाश बेहरे, पो. ना. प्रमोद बागड़े, पो.कॉ. शेखर सालुंखे, पो. कॉ. गणेश पाटील यांच्या पथकाने शहरातील धुळे रोडवर एच.पी. गॅस गोडावूनसमोर ही कारवाई केली. नीलेश अशोक पाटील (वय २५ रा.जानवे) हा मोटारसायकलवर कापडी झोल्यांमध्ये दारू घेऊन जात होता.. नीलेशजवळ परवाना नव्हता. हितेश बेहरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.