नशिराबाद पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील २५ तरूणीला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना ५ मे रेाजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील खालची अळी येथील रहिवासी सुचिता सचिन चौधरी (वय-२५) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ मे रोजी दुपारी ३ वाजता घरी असतांना किरकोळ कारणावरून हरीष पुरूषोत्तम येवेले, उज्ज्वला हरीष येवेले रा. खालीची अळी,. नशिराबाद ता.जि.जळगाव यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी तरूणीने नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी हरीष पुरूषोत्तम येवेले, उज्ज्वला हरीष येवेले यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिल मोरे करीत आहे.