धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती नागरीकांचा मागास प्रर्वग व सर्वसाधारण प्रर्वगाकरीता ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण बाबतचा कार्यक्रम सोडत पध्दतीने दिनांक 08/07/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच एक व्दितीयांश सरपंच पदे महिलासाठी आरक्षण (अनु. जाती, अनु. जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण) मा. उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 08/07/2025 रोजी दुपारी 1.00 वा. तहसिल कार्यालय धरणगांव येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण पुढील पाच (5) वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर सभेसाठी सर्व पदाधिकारी / ग्रामस्थ इच्छुक नागरीक यांनी उक्त वेळी व ठिकाणी हजर राहणेबाबत आवाहन तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.