Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
    क्राईम

    नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

    editor deskBy editor deskJuly 4, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील मोहननगर येथील २९ वर्षीय तरुण व्यावसायिक विनय अशोक देशमुख याने नैराश्यातून मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. दिवसभर शोधकार्य सुरू राहिल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

    सविस्तर वृत्त असे कि, विनय देशमुख यांचे शहरात झेरॉक्सचे दुकान होते. तर त्याचे वडील अडावद येथील जि.प. शाळेत माध्यमिक शिक्षक आहेत. काही दिवसांपासून विनय नैराश्यात होता. गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला असेल असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, तो दुकानावर पोहोचला नसल्याचे लक्षात आले. दिवसभर शोध मोहीम सुरू होती, मात्र विनयचा शोध लागला नव्हता. अखेर, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला. त्यानंतर मृतदेह जीएमसीत आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

    शोध घेत असताना विनय मेहरूण तलावावर गेल्याची माहिती मिळाली. तलावाच्या परिसरात त्याची दुचाकी आढळली. यामुळे त्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आला. कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.