भुसावळ : प्रतिनिधी
वलसाड गुजरात येथून खून करून फरार होत असलेल्या दोन संशयितांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, अभिषेककुमार अर्जुन ठाकूर (२१, रा. नवडीहा गोंडा, झारखंड) असे संशयिताचे नाव आहे व दुसरा संशयित अल्पवयीन आहे. रेल्वे प्रशासनातर्फे आरोपींना पकडण्यासाठी ऑपरेशन रेल प्रहरी राबविले जाते. त्यात मिळालेल्या माहितीवरुन वलसाड (गुजरात) येथून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना गाडी क्रमांक २२९१४ त्यातून भुसावळ रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ४ वरून ताब्यात घेण्यात आले आहे.
या दोघांविरुद्ध डोंगरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे भुसावळ विभागाचे आयुक्त चैत्रेज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ निरीक्षक पी. आर. मीना, पीएसआय दीपक कव्हले, नीलेश अढवाल, विजय पाटील, भूषण पाटील, संजना साहू, शिवानंद गीते, कपिल संगवान तथा सीपीडीएस टी चे महेंद्र कुशवाह यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. आरोपींना गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.