जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात सर्व समाजात एकता व सलोख्याचे वातावरण निर्मीतीसाठी संदेश देण्यासाठी स्वाक्षरी मोहिम राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. शनिवारी ७ मे रोजी सकाळी स्वाक्षरी मोहीमेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
राज्यात सध्या भोंग्यांचा विषय चांगलाच गाजत आहे. त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस मुख्यालयासमोर जळगाव जिल्ह्यात सर्व समाजात एकता व सलोख्याचे वातावरण निर्मीतीसाठी संदेश देण्यासाठी स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येणार आहे. ही स्वाक्षरी मोहिम शनीवार ७ मे रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त डॉ. गायकवाड आदी उपस्थित राहणार आहे. नागरीकांना स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी केले आहे.