जळगाव मिरर | ३ जुलै २०२५
चोपडा धरणगाव रस्त्याचे कोट्यावधी रुपयांचे काम सुरू आहे. दळणवळणाची साधने वाढवावी तसेच नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने रस्त्यांचे जाळे विणायला सुरुवात केली आहे अत्यंत पारदर्शक पणे काम व्हावे यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत परंतु कुंपणच शेत खात आहे असा प्रकार मस्तवाल ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांना खिशात ठेवून सुरू आहे.
चोपडा धरणगाव रस्त्यासाठी निविदामध्ये ज्या पद्धतीने अटी शर्ती आहे त्या अटी शर्तींच्याद्वारे कुठलीही काम सुरू नाही अक्षरशः शेतकऱ्यांच्या बांधावरील काळी माती काढून रस्त्यावर टाकली जात आहे काही शेतकरी बोलायला गेले तर त्यांच्यावर दादागिरी ची भाषा वापरली जाते मस्तवाल ठेकेदाराचे आणि पराक्रम पुढे येत असून त्या ठेकेदाराचे बगलबच्चे मात्र कुणालाही मोजायला तयार नाही या रस्त्याच्या कामात 70 टक्के खिशात 30 टक्के काम असा प्रकार सुरू आहे ठिगळ लावण्याचे काम रस्त्यावर सुरू आहे काम झाल्यानंतर वर्षभरात हा रस्ता फार जुना रस्ता आहे अशी दुर्दशा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. कोट्यावधी रुपयांचे घबाड या रस्त्याच्या माध्यमातून दाबले जाणार असल्याचे समजते. शासनाने वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी अशी मागणी होत आहे.