प्रतिनिधी प्रविण पाटील। जळगाव तालुक्यातील लमांजन, वाकडी कुऱ्हाडदे या तिन्ही गावांची गृप ग्रामपंचायत कार्यालयात लमांजन येथे आहे. या ग्रामपंचायतीवर नऊ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. या संचालक मंडळातील लमांजन येथील सदस्यांनी करभरणा मुदतीत केला नसल्याने त्यांना अपात्र करणेबाबत तक्रार जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे ग्रामस्थांनी तक्रार दिली आहे.
ग्रामस्थ गोरख धोंडु पाटील, प्रदिप कैलास पाटील व इतर ग्रामस्थ यांनी अर्जाद्वारे २७ एप्रिल रोजी केली आहे.दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील लमांजन, वाकडी, कुऱ्हाडदे या तिन्ही गावांची गृप ग्रामपंचायत कार्यालयात लमांजन येथे आहे. या ग्रामपंचायतीवर ९ सदस्यांचे संचालक मंडळ आहे. या संचालक मंडळातील लमांजन येथील सदस्यांनी करभरणा मुदतीत केला नसल्याने त्यांना अपात्र करणेबाबत तक्रार जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांचेकडे गोरख धोंडु पाटील, प्रदिप कैलास पाटील व इतर ग्रामस्थ यांनी अर्जाद्वारे २७ एप्रिल रोजी केली आहे. तसेच या ग्रामपंचायतीत पुढील सदस्यांनी सतत सहा महिने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कुठलीही परवानगी न घेता सहभाग घेतला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे, अशा ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रेची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी देखील गोरख धोंडु पाटील, ईश्वर बळीराम पाटील, किरण सुरेश पाटील व गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान तत्कालीन सरपंच,उपसरपंच, सदस्य यांनी या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुक असतांना १४वित्त आयोगातुन ग्रामरोजगार सेवक समाधान युवराज कोळी यांच्या नावावर २५ सप्टेंबर २०२० रोजी धनादेश १ लाख ३ हजार रूपये, २७ सप्टेंबर २०२० रोजी १ लाख २५ हजार रूपये तसेच शिपाई गोकुळ ओंकार पाटील यांच्या नावावर ५ ऑक्टोबर२०२० रोजी ७ हजार रूपये आणि २५ नोव्हेंबर २०२० रोजी ३५ हजार रूपये धनादेशद्वारे काढल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. या ग्रामपंचायतीवर ७ सप्टेंबर २०२० रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने शेखर शिंपी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर हे धनादेश वटवल्याचे समोर आले आहे. यावरून तत्कालीन सरपंच यांनी प्रशासक नेमणुक असतांना व त्यांना सहीचा अधिकारी नसतांना हा प्रकार केला असल्याने कार्यवाहीसाठी सुनिल दिनकर मोरे व इतर ग्रामस्थ यांनी अर्जाद्वारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा परिषद यांच्याकडे केली आहे. तसेच सुनिल दिनकर मोरे व ग्रामस्थ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांचेकडे २८ एप्रिल २०२१ च्या लमांजन ग्रृप ग्रामपंचायत १४ वित्त आयोग योजनेच्या तक्रार अर्जानुसार चौकशी झाली नसल्याची तक्रार २७ एप्रिल २०२२रोजी दिली आहे. या ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कार्यकाळात विविध गैरप्रकार झाले असल्याचे येथील तक्रारदार व नागरिक यांचे म्हणणे आहे. तरी मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा परिषद यांनी दाखल तक्रारींची दखल घेऊन सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.