पारोळा : प्रतिनिधी
सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना दोन वनपालांना पकडण्यात आले. यात महिला वनपालाचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, दिलीप भाईदास पाटील (५२, मोंढाळा, ता. पारोळा, रा. धुळे) आणि वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (३८, रा. चोरवड, ता. पारोळा) अशी लाच घेणाऱ्या वनपालांची नावे आहेत. याबाबत दोन्ही संशयिताना ताब्यात घेण्यात आहे. त्यांच्याकडील मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत. तसेच एक संशयित वैशाली गायकवाड यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. याबाबत पारोळा पोलिसात या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सहायक फौजदार सुरेश पाटील, हे.कॉ. शैला धनगर, हे.कॉ. किशोर महाजन, कॉ. राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे पारोळा परिसरात खळबळ उडाली आहे.