भडगाव : प्रतिनिधी
शहरातील पाचोरा चौफुलीजवळ सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्या तिघांना पोलिसांनी विचारणा केली असता त्या तिघांनी पोलिसांशी हुज्जत घातली. सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोहेकॉ. ज्ञानेश्वर नाना पाटील (४५) यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. राजेंद्र रमेश खैरे (३६), विक्की रमेश सोनवणे (२८), प्रतीक मार्तड सोनवणे (१९, तिन्ही यशवंत नगर, भडगाव) यांनी पोहेकॉ. विजय जाधव व पोना, मंगलसिंग गायकवाड यांच्यासह ज्ञानेश्वर पाटील हे गस्त घालत असताना हे तिघेही पाचोरा चौफुलीजवळ आढळून आले. शांततेच्या भंग करत असल्याबद्दल त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून मारहाण केली.