जळगाव : प्रतिनिधी
नऊ गंभीर गुन्हे दाखल असण्यासह दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तवणुकीत सुधारणा होत नसलेल्या सचिन उर्फ टिचुकल्या कैलास चौधरी (२६, रा. गणेशवाडी) याच्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई करीत स्थानबद्ध करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३० जून रोजी दिले.
जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सचिन चौधरी याच्यावर नऊ वेगवेगळे गुन्हे दाखल असून दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरी देखील सुधारणा न झाल्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव पाठविला होता