जळगाव : प्रतिनिधी
आज जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील प्राथमिक विद्या मंदिर तांडा या शाळेत हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या सहकार्याने प्राप्त झालेल्या वह्यांचे वाटप १ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा दुध संघाचे संचालक रमेश पाटील हे होते.
सुरवातीला अध्यक्षांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंर आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती सोनार यांनी केले व उपस्थित मान्यवरांनी वसंतराव नाईक यांच्या बद्दल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात रमेश पाटील यांनी वसंतराव नाईक यांनी केलेल्या जनकल्याणकारी कामे व जीवन प्रवासातील काही ठराविक घटनांचा उजाळा विद्यार्थ्यांसमोर केला त्यानंतर या शाळेतील १ ली ते ४थीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी जळगाव दुध संघाचे संचालक रमेश पाटील, जळगाव आत्मा समितीचे माजी अध्यक्ष पि.के.पाटील, शिवसेनेचे जळगाव तालुका समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण, जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे, जळके वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन प्रविण पाटील, शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष भुरा चव्हाण, बळीराम तंवर, किशोर चव्हाण , शाळेतील उपशिक्षक मयुरी सोमारी व मुख्याध्यापिका सौ भारती सोनार व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती सोनार यांनी उपस्थितांचे आभार मानले