• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

editor desk by editor desk
June 30, 2025
in कृषी, राज्य
0
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असून या पावसाच्या तडाख्याने टोमॅटोच्या दर्जावर परिणाम झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत आहे. मात्र, यामध्ये पावसाचा मार खाल्लेल्या टोमॅटोचे प्रमाण जवळपास निम्म्यावर पोहचले आहे. पावसाच्या तडाख्याने दर्जात घसरण झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटोचे दर कोसळले आहेत. मध्यंतरीच्या काळात बाजारात बंगळुरूचा टोमॅटो दाखल होत होता.

मात्र, तेथील स्थानिक बाजारपेठांमध्येही टोमॅटोचे दर वाढल्याने तेथील व्यापार्‍यांनी पुण्यातील बाजारपेठेकडे टोमॅटो पाठविण्यास बंद केल्याचे निरीक्षणही व्यापारीवर्गाकडून नोंदविण्यात आले.स्थानिक गवारीचा हंगाम संपल्याने बाजारात गवारीची आवक घटली आहे.

याखेरीज, स्थानिक कोबी व फ्लॉवरच्या दर्जात घसरण झाली आहे. परराज्यातून बाजारात दाखल होणार्या या फळभाज्यांची दर्जा चांगली आहे. मात्र, त्यांची आवक कमी आहे. शेवग्याच्या हंगाम संपत चालला आहे. सध्या बाजारात परराज्यातील शेवगा चांगला उपलब्ध आहे.

स्थानिक आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी, या सर्व फळभाज्यांच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाड झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांची आवक स्थिर आहे.

बाजारात रविवारी (दि. 29) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 80 ते 90 ट्रक इतकी फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, इंदौर येथून गाजर 9 ते 10 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, हिमाचल प्रदेश 3 टेम्पो मटार, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी 2 ते 3 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूणाची सुमारे 9 ते 10 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 40 ते 45 टेम्पो यांचा समावेश आहे.

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 400 ते 500 गोणी, भेंडी 6 ते 7 टेम्पो, गवार 6 ते 7 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेटस, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, भुईमुंग शेंग 100 ते 125 गोणी, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 75 ते 80 टेम्पो इतकी आवक झाली.

 

Previous Post

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

Next Post

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

Next Post
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group