• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

editor desk by editor desk
June 30, 2025
in क्राईम, जळगाव
0
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करण्यासाठी वाहनात भरून ठेवलेल्या चार लाख दोन हजार ७५ रुपये किमतीच्या सिगारेट चोरट्यांनी लांबविल्या. हा प्रकार २७जून रोजी रात्री ते २८ जून सकाळी नऊ वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, नवीपेठ परिसरात चंद्रशेखर  जवरीलाल राका (५०, रा. नवीपेठ) यांचे सी. जे. ट्रेडिंग कंपनी नावाचे दुकान आहे. दिवसभरात जिल्हाभरातून आलेल्या ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे सायंकाळी गाडीत माल भरून हे वाहन गोविंदा रिक्षा थांब्याजवळ उभे केले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑर्डरप्रमाणे सिगारेट व इतर मालाचा पुरवठा केला जातो. २७जून रोजी मालवाहू वाहनात (क्र. एमएच. १९, सीवाय. ०१२३) माल भरून हे वाहन रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास गोविंदा रिक्षा थांब्याजवळ उभे केले होते. त्यानंतर रात्रीतून चोरट्यांनी वाहनाच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यातून वेगवेगळ्या सिगारेट कंपनीची तब्बल सहा हजार १९० पाकिटे चोरून नेली. त्यांची किंमत चार लाख दोन हजार ७५ रुपये आहे.

शहर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करीत फुटेज ताब्यात घेतले. फुटेजमध्ये चोरटे चोरी करताना कैद झाले असून, ही घटना पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात आहे. दुसऱ्या दिवशी २८ जून रोजी सकाळी ९ वाजता चालक शंकर जाधव हे वाहनाजवळ आले त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी मालक चंद्रशेखर राका यांना माहिती दिली. राका यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सुनील पाटील करीत आहेत.

Previous Post

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

Next Post

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

Next Post
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group