प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील लंमाजन, वाकडी, कुराडदे ग्रामपंचायतीमध्ये चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीच्या घोटाळ्यासह सतत गैरहजर राहणाऱ्या ग्रामपंचात सदस्यांना अपात्र करण्याचे निवेदन मंगळवारी २६ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील लंमाजन, वाकडी, कुराडदे या गावाच्या ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा सरपंच व उपसरपंच यांना अधिकार नसतांना धनादेशद्वारे गैरव्यवहार करण्यात आले आहे. या ग्रामसेवक व शिपाई यांनी खोट्या सह्या करून अपहार केला आहे. लमांजन गावातील ग्रामपंचायतीचे तीन सदस्य, वाकडी गावातील ३ सदस्य आणि कुऱ्हाडदे गावातील तीन सदस्य असे एकुण ९ ग्रामपंचायत सदस्यांनी मुदतीत कर भरणा केला नाही म्हणून त्यांना अपात्र करण्यात यावे. शिवाय गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता सतत गैरहजर राहणारे ग्रामपंचायत सदस्य गोरख निंबा पाटील, विजय बापू पाटील, भारतीबाई विठ्ठल पाटील यांनाही अपात्र करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
या निवेदनावर लमांजन, कुऱ्हाडदे, वाकडी येथील ग्रामस्थ सुनील मोरे, ईश्वर पाटील, सुखदेव पाटील, जयराम पाटील, राजेंद्र मोरे, गोरख पाटील, राजेंद्र धनगर, बंडू पाटील, हिरामण कोळी, महादू पाटील, रमेश गुंजाळ, विश्वास गुंजाळ, बापू पाटील, रतिलाल सोनवणे, दिनेश पाटील, विनोद पाटील, अमोल पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.