Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !
    क्राईम

    गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskJune 29, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    घरगुती वापरासह व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा करून ठेवणाऱ्या वसीम चंगा शाह (२८, रा. वीर सावरकर नगर, पिंप्राळा) याला रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेत १९ गॅस सिलिंडर जप्त केले. ही कारवाई २७ जून रोजी वीर सावरकर नगरात करण्यात आली. या प्रकरणी शाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, पिंप्राळा परिसरातील वखारीजवळ एका व्यक्तीच्या घरात विक्री करण्याच्या उद्देशाने गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या साठा केल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोउनि सचिन रणशेवरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, विनोद सूर्यवंशी, अजय सपकाळे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने कारवाई करत गॅस सिलिंडर व साहित्य जप्त केले.

    पोलिसांनी छाप्यात शाह याच्या घरातून आठ भरलेले व ११ रिकामे असे एकूण १९ गॅस सिलिंडर, दोन वजनकाटे व एक रेग्युलेटर असा एकूण ५९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पथकाने पिंप्राळा परिसरातील वखारीजवळील वीर सावरकर नगरातील एका घरात छापा टाकला असता तेथे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरसह वजन काटा आढळून आला. हे साहित्य जप्त करण्यासह वसीम शाह याला ताब्यात घेतले.

    गॅस सिलिंडर कुठून घेतले याविषयी पोलिसांनी शाह याच्याकडे विचारणा केली, मात्र त्याने कुठलीही माहिती पोलिसांना दिली नाही. याप्रकरणी पोलिस नाईक विनोद सूर्यवंशी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.