जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या गृह विभागाच्या निकालामध्ये दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक नारायण व्यंकटराव पाटील यांची लिपिक पदी निवडीबद्दल त्यांचे दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा. वासुदेव पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
आपल्या मनोगतात नारायण पाटील यांनी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे आभार व्यक्त केले. शासकीय नोकरीची ही माझी चौथी वेळ आहे याअगोदर माझी डाक सहाय्यक, कालवा निरीक्षक व तलाठी या तीन ठिकाणी निवड झाली होती. परीक्षेचा अभ्यास करत असतांना अनेक वेळा अपयशाला तोंड द्यावे लागते पण विद्यार्थ्यांनी ध्येय, जिद्द, अभ्यासात सातत्य चालू ठेवले पाहीजे यश निश्चित मिळतेच. नारायण पाटील यांनी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अनेक वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना आपले बहुमोल मार्गदर्शन दिले आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय ते आई-वडील व दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा. वासुदेव पाटील यांना दिले. प्रा. वासुदेव पाटील सर दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राद्वारे अनेक विद्यार्थ्यांना घडवत असतात ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते त्यांना आर्थिक मदतही करत असतात. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने नारायण पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून पुनश्च अभिनंदन करण्यात आले.