Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !
    क्राईम

    भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

    editor deskBy editor deskJune 27, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

    फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मठपाटी परिसरातील पुलावरील दुभाजकाला कार धडकून तीन ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) रात्री अकरा वाजेदरम्यान घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद मारून माजीद (१८, रा. रोशनगेट), रियान जमील शेख (१६, रा. पिंपरी राजा), अफरात असिफ शेख (१७, रा. पिंपरी राजा छत्रपती संभाजीनगर) असे मृत झालेल्या तिघांची नावे आहेत. उजेर फिरोज खान, शरीफ शेख या दोघांवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील पाच जण कारने (एम. एच.२० ई.जे. १५८६) छत्रपती संभाजीनगर येथून फुलंब्री परिसरात जेवणासाठी एका हॉटेलवर आल्याची प्राथमिक माहिती आहे. दहाच्या सुमारास रात्री जेवण करून कारने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले होते. मठपाटी पुलावर पादचाऱ्यांना पायी जाण्यासाठी तयार केलेल्या डाव्या बाजूच्या दुभाजकाला कारची जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली होती.

    या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन फुलंब्री पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता सय्यद मारून, रियान शेख, अफरात शेख या तिघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर उजेर खान, शरीफ शेख या दोन्ही गंभीर जखमींना प्राथमिक उपचार करून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.