Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
    राजकारण

    राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

    editor deskBy editor deskJune 27, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात हिंदी सक्ती विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, या मुद्यावरुन पुढील आठवड्यात मुंबईत निघणार्‍या सर्वपक्षीय मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. तशी सूचक पोस्ट ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी X वर केली आहे. ‘महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!’ असे राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

    हिंदी सक्ती विरोधात आयोजित केलेल्या ५ जुलैच्या मोर्च्यात सहभागी व्हावे, असा फोन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एका नेत्याला केल्याचे समजते. मराठी माणसाचा हा मुद्दा आहे, त्यावर एकत्रित लढा देवू, असा निरोप राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या विश्वासू साथीदाराला शुक्रवारी दिला. हा विश्वासू नेता संजय राऊत असावेत अशी चर्चा आहे. राज आणि उद्धव या दोघांशीही राऊत यांचे चांगले संबंध आहेत. ५ जुलैची तारीख बदलण्यामागचे कारणही ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेली विनंती असल्याचे मानले जाते.

    राज ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्‍ट्रात हिंदीची सक्‍ती चालणार नसल्याचे सांगत ६ जुलै रोजी मनसेचा मोर्चा निघेल, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. या मोर्चामुळ‍े सरकारला धडकी भरेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात हिंदी सक्ती लादू देणार नसल्याचा इशारा दिला. मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली त्रिभाषा सूत्रविरोधी समन्वय समितीनेही ७ जुलै रोजी मोर्चा निघणार असल्याचे जाहीर केले. हिंदी सक्ती विरोधातील आंदोलनात सर्वांनी पक्षभेद विसरुन सहभागी होण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

    त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेच्या मोर्चाची तारीख बदलून ६ जुलैऐवजी ५ जुलै अशी केली. त्यांनी या मुद्यावरुन एकच मोर्चा निघावा, अशी भूमिका स्पष्ट केली. याबाबत उद्धव ठाकरेंच्या नेत्यांशी आमचे चर्चा करतील. उद्धव ठाकरे यांनीही या मोर्चात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत मी त्यांच्याशी बोलणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.