बोदवड : प्रतिनिधी
अयोध्या येथील अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथील पोलिस बोदवडमध्ये ठाण मांडून होते. दोन दिवस चाललेल्या चौकशीनंतर बोदवड येथील तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेत हे पथक रवाना आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अयोध्या येथील जन्मभूमी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन साडेसोळा वर्षीय मुलीने आत्महत्या केली. या तरुणीची सोशल मीडियावर बोदवड येथील तरुणासोबत मैत्री झाली व या प्रकरणात तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या तरुणीच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक काढून अयोध्या येथील पोलिस बोदवड शहरात आले होते. याप्रकरणी त्यांनी बोदवड शहरातील कुरेशी वाड्यात राहणारा विवाहित समीर कुरेशी या तरुणाची चौकशी करत गुरुवारी (दि. २६) वैद्यकीय तपासणी करून त्याला ताब्यात घेत पुढील चौकशीसाठी सोबत घेऊन गेले आहे