जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी २२ वर्षीय तरूणीवर अल्पवयीन असतांना आठ वर्षांपासून सतत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळातील २२ वर्षीय तरूणी सध्या जळगावात राहत आहे. ८ वर्षांपूर्वी म्हणजे तिचे वय १४ वर्ष असतांना ती भुसावळातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी भुसावळातील रितेश सुनील बाविस्कर याची ओळख मुलीशी झाली. त्याने शाळेत होणारे विविध कार्यक्रमांचे वेळी केव्हातरी मोपिंग केलेले अश्लिल फोटो व व्हिडीओ मुलीला दाखवले आणि धमकी दिली की, ‘तुला जसे सांगेन तसे कर नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेल’ अशी धमकी दिली. त्यानुसार तरूणी आठ वर्षांपुर्वी अल्पवयीन असताना गाडीवर जबरदस्ती बसवून सोबत रीतेशचा मित्र बंटी आणि राहुल हे देखील होते. इंजिनघाट परिसरात घेऊन तिथे तिच्यासोबत अत्याचार केला. तर बंटी आणि राहुल यांनी अत्याचाराचे फोटो काढले तसेच तिच्या हातातील सोन्याची अंगठी काढून तिला पूर्ण शाळेजवळ सोडले. तसेच रितेश सांगितले की, ‘तू जर कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करील’ अशी धमकी दिली. त्याचप्रमाणे रितेशची आई शोभा बाविस्कर आणि बहीण यांनी मुलीला घरातून पैसे चोरून आणावे सांगितले.
हा प्रकार गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू होता. याचदरम्यान मुलगी २२ वर्षाची झाली असताना तिच्या नातेवाईकांनी तिचा लग्नाचा विषय सुरू केला. हा विषय रितेश समजल्यानंतर त्याने १९ एप्रिल रोजी तरुणीला कॉलेजमधून गाडीवर बसून घेऊन बिग बाजार येथे जळगावला आणले. या ठिकाणी देखील विनयभंग करून तिच्यावर अत्याचार केला आणि ‘मला तुझ्यासोबत लग्न करायचा आहे, लग्न केले नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल’ अशी धमकी दिली.
छळाला व अत्याचाराला कंटाळून तरुणीही सोमवारी २५ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रितेश सुनील बाविस्कर, त्याची आई शोभा सुनील बाविस्कर, त्याची बहीण नंदनी राहुल कोळी, त्याचे वडील सुनील बाविस्कर सर्व रा. भुसावळ, मित्र उर्वेश पाटील बंटी आणि राहुल (पुर्ण नावे माहित नाही) अशा ७ जणांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार करीत आहेत.