जळगाव : प्रतिनिधी
रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव दुचाकीने धडक देत जखमी केले. ही घटना दि. २४ रोजी शहरातील खंडेराव नगर रेल्वे पुलाखाली घडली. याप्रकरणी धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण परिसरातील इकबाल कॉलनीत मुजमील मोहम्मद युनूस पिंजारी (वय २४) हे तरुण वास्तव्यास असून ते डॉक्टर आहे. दि. २४ रोजी ते (एमएच १९, ईसी ७२८६) क्रमांकाच्या दुचाकीने मित्रासोबत जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, ईसी ७२८६) वरील चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.