Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
    राजकारण

    किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

    editor deskBy editor deskJune 25, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यातील मशि‍दींवरील अनधिकृत भोग्यांचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मशिदींवरून जबरदस्तीने भोंगे उतरवले जात असल्याचा आरोप यावेळी मुस्लिम संघटनांनी केला आहे. तर किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करत असल्याचा दावा ही मुस्लिम संघटनांकडून करण्यात आला आहे.

    मुस्लिम संघटनांनी स्पष्टपणे सांगितलं की, जर किरीट सोमय्या यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकून कारवाई करण्यात आली तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल आणि याला किरीट सोमय्या जबाबदार असतील. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ नये, त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

    दरम्यान, किरीट सोमय्या हे काही ठिकाणी मशिदीत जात असल्याचे समोर आले होते. मशि‍दीवरील भोंग्यासंदर्भात सोमय्या यांनी यापूर्वी सुद्धा आंदोलन केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मशि‍दीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यात आंदोलनं पेटलं होते.

    दरम्यान, अनधिकृत भोंग्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती बैठकीला हजर होते. बैठकीत पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी उच्च न्यायालयाने घातलेली ४६ ते ५६ डेसिबल आवाज मर्यादा पालन होऊच शकत नाही याच प्रात्याक्षिक दाखवलं. बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाज देखील ४६ डेसिबल पेक्षा जास्त आहे, याचं प्रात्याक्षिक देवेन भारती यांनी अजित पवारांना करून दाखवलं.

    त्यानंतर अजित पवारांकडून पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नियमांची पायमल्ली करणार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नये, असेही सांगितले. तर मुंबईत १५०० भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.