Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव – भुसावळ महामार्गावर दोन ट्रकचा अपघात : चालक ठार !
    क्राईम

    जळगाव – भुसावळ महामार्गावर दोन ट्रकचा अपघात : चालक ठार !

    editor deskBy editor deskJune 24, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव – भुसावळ महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळील महामार्गांवर दोन ट्रकची जोरदार धडक झाल्याने या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा चालक हा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडला.

    सविस्तर वृत्त असे कि,  ओडिशा पासिंगचा ट्रक (क्रमांक ओडी 15 सी.2963) व राजस्थान पासिंगचा ट्रक (क्रमांक आर.जी.14 जेटी 0421) यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर एका ट्रकमधील चालक कॅबिनमध्ये अडकल्याने दोरीच्या सहाय्याने ओढून त्याला बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

    दुसर्‍या ट्रकचा चालक गंभीर जखमी असून त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाली आहे. त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर एमआयडीसी पोलिस व वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातस्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.