Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » द्रौपदी नगरातील बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबविली
    क्राईम

    द्रौपदी नगरातील बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबविली

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 22, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । द्रौपदी नगरातील बंद घर फोडून घरातील कपटातून सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    शहरातील दौप्रदी नगरातील भगवान भोमा पाटील हे एका खासगी कंपनीत मार्केटींग मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. ते मुळचे पारोळा येथील रहिवाशी असून ते पत्नी जयश्री व मुलगा अंश अशांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे सासरे कृष्णा पाटील हे शहरातील अयोध्या नगरात राहतात. भगवान पाटील यांच्या सासूचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे बुधवारी २० एप्रिल रोजी रात्री घराला कुलूप लावून ते पत्नी व मुलाला घेऊन अयोध्यानगरात आले होते. याच दरम्यान, गुरुवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. तर घरातील तसेच कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांनी घरातील कपाटातील साहित्याची पाहणी केली असता. कपाटात ठेवलेले दागिने व रोकड लांबविल्याचे त्यांना दिसले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.