• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दिवे घाट सर केल्यानंतर माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला ; व्हिडीओ व्हायरल !

editor desk by editor desk
June 24, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
दिवे घाट सर केल्यानंतर माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला ; व्हिडीओ व्हायरल !

पुणे : वृत्तसंस्था

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं विठुरायाकडे निघाला आहे. माऊलीच्या पालखी आज जेजूरीमध्ये दाखल झाली. रविवारी दिवे घाट पार करून पालखी सासवड मुक्कामी पोहोचली असून, येथे मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होती. दिवे घाट सर केल्यानंतर माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंढरीच्या वाटेत काही ठिकाणी पावसाच्या सरींचा अनुभव येतोय. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत वारकरी आपली सेवा व भक्तीभावात तल्लीन होत वाट चालत आहेत. दिवे घाट पार केल्यानंतर सासवड जवळ अचानक गर्दीमुळे बैल उधळला. सासवडच्या जवळ माऊलीची पालखी विसावाल्या थांबली होती, त्यावेली गर्दीमुले एक बैल उधळला. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती, याचा व्हिडिओ आता समोर आलाय.

पालखी सोहळ्यात अचानक बैल उधळल्यामुळे वारकरी आणि नागरिकांची धावपळ उडाली. थोड्यावेळासाठी पालखीमध्ये भीतीचे वातावरण होते, पण त्या बैलाला कंट्रोल केल्यानंतर वातावरण शांत झालं. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. दिवे घाट सर करण्यासाठी माऊलींच्या रथाला चार ते पाच बैल जोड्या होत्या. त्यामधील एक बैल गर्दी पाहून उधळला अन् गोंधळ उडाला होता. वेळीच बैलावर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीत दाखल होणार आहे. आज पहाटेपासूनच लाखो वारकरी खंडोबाच्या दर्शनासाठी गडावर जमले आहेत…शैव आणि वैष्णव परंपरेचा हा अनोखा संगम आज जेजुरीत खंडोबा गडावर होतोय…ड्रोन कॅमेऱ्यातून पाहूया खंडोबा गडाची ही खास दृश्यं…वारकऱ्यांची मांदियाळी, फड, अभंग, टाळ मृदुंगाचा गजर… आणि त्या भक्तीमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दाखल होणार आहे…खंडोबा गडावरचा लाखो वारकऱ्यांचा आजचा नजारा म्हणजे वारी परंपरेचा एक अध्याय.

 

Previous Post

पावसाची संततधार कायम : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी !

Next Post

जळगाव – भुसावळ महामार्गावर दोन ट्रकचा अपघात : चालक ठार !

Next Post
जळगाव – भुसावळ महामार्गावर दोन ट्रकचा अपघात : चालक ठार !

जळगाव - भुसावळ महामार्गावर दोन ट्रकचा अपघात : चालक ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव – भुसावळ महामार्गावर दोन ट्रकचा अपघात : चालक ठार !
क्राईम

जळगाव – भुसावळ महामार्गावर दोन ट्रकचा अपघात : चालक ठार !

June 24, 2025
दिवे घाट सर केल्यानंतर माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला ; व्हिडीओ व्हायरल !
राजकारण

दिवे घाट सर केल्यानंतर माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला ; व्हिडीओ व्हायरल !

June 24, 2025
पावसाची संततधार कायम : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी !
जळगाव

पावसाची संततधार कायम : दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी !

June 24, 2025
अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
अमळनेर

अमळनेर : कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 24, 2025
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास
क्राईम

जळगावातील बसस्थानकावरून आरोग्य सेविकेच्या गळ्यातून सोन्याची पोत लांबविली !

June 24, 2025
नौदलाच्या अधिकाऱ्याने घेतली ३० हजाराची लाच
क्राईम

घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी  ग्रामसेवकाने घेतली ५ हजारांची लाच !

June 24, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group