पाचोरा प्रतिनिधी । विवाहितेला तिच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत शरीरसंबध ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहिता पती आणि मुलासह वास्तव्याला आहे. १९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान विवाहिता ही बकऱ्यांसाठी चारा आणत असतांना संशयित आरोपी नितीन एकनाथ जाधव याने विवाहितेला तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. विवाहितेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितले. याचा जाब विचारण्यासाठी विवाहितेचा पती संशयित आरोपी नितीन जाधव याच्याकडे गेला असता सोनाली जाधव, संदीप जाधवी, नितीनचा पाहुणा, नितीनीची आत्या जिजाबाई, सुनिता वाल्मिक जाधव, लिलाबाई जाधव, अनिल देविदास काळे यांनी विवाहितेच्या घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केली. आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली . त्यांच्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली. पुढील तपास पोउनि विजया वसावे हे करीत आहे.