Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » “नरेंद्र मोदी देशाची प्रमुख संपत्ती” ; कॉंग्रेस नेत्यांकडून पंतप्रधानांची पुन्हा स्तुती
    राजकारण

    “नरेंद्र मोदी देशाची प्रमुख संपत्ती” ; कॉंग्रेस नेत्यांकडून पंतप्रधानांची पुन्हा स्तुती

    editor deskBy editor deskJune 23, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ वर लिहिलेल्या एका स्तंभात त्यांनी पंतप्रधान मोदींना भारतासाठी एक प्रमुख संपत्ती म्हणून वर्णन केले आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदींची ऊर्जा, सक्रियता आणि इच्छाशक्तीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला बळकटी मिळाली आहे. यापूर्वीही त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते, त्यानंतर ते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.

    शशी थरूर यांनी लिहिले की, “पंतप्रधान मोदींची ऊर्जा, गतिमानता आणि सहभाग घेण्याची तयारी यामुळे भारत जागतिक स्तरावर एक मजबूत स्थानावर पोहोचला आहे. ते भारतासाठी एक प्रमुख संपत्ती आहेत, परंतु या मोहिमेला अधिक पाठिंब्याची आवश्यकता आहे.” त्यांनी असेही म्हटले की ऑपरेशन सिंदूर ही परदेशात भारताची प्रतिमा मजबूत करण्याची एक उत्तम संधी आहे. शशी थरूर यांनी आपल्या स्तंभात, “या मोहिमेतून त्यांना कळले की भारताला पुढे नेण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत. पहिला- एकतेची शक्ती, दुसरा- स्पष्ट आणि प्रभावी संवाद, तिसरा- सॉफ्ट पॉवरचा योग्य वापर आणि चौथा- दीर्घकालीन विचार आणि परराष्ट्र धोरण.” असे म्हटले आहे.

    यासोबतच, त्यांनी असे सुचवले की भारताने आपल्या जागतिक रणनीतीमध्ये तीन गोष्टींवर भर द्यावा. पहिला- तंत्रज्ञान, दुसरा- व्यापार आणि तिसरा- परंपरा. काँग्रेसमधील काही नेत्यांनीही ऑपरेशन सिंदूरमध्ये शशी थरूर यांच्या सहभागाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते, परंतु त्यांनी स्पष्ट केले की त्यांचे उद्दिष्ट फक्त भारताची प्रतिमा मजबूत करणे आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.