मुंबई प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून फोन टॅपींग प्रकरण सुरू आहे. दरम्यान याच प्रकरणातील चौकशीत अजून एक मोठा गौप्यस्फोट समोर आला असून खा. संजय राऊत आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे याची टोपण नावे वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना राज्यातील काही राजकारण्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे प्रकरण आता गंभीर वळणावर गेल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात आधीच कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून यात तत्कालीन पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचाही समावेश आहे.
या प्रकरणात आतापर्यंत संजय राऊत आणि एकनाथराव खडसे यांनी आपले जबाब नोंदविले असून सोबत सहा साक्षीदारांचेही जबाब घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीतून आता नवीन धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणात सहभागी असणार्या इतर पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार राऊत आणि खडसे यांच्या फोन टॅपींगचे निर्देश देतांना त्यांच्याच नावाचे साधर्म्य असणारी पण बनावट नावे वापरण्यात आल्याची माहिती या पोलिस अधिकार्यांनी दिली आहे